Pune news: हांडेवाडी येथे आगीत वाहने भस्मसात

एमपीसी न्यूज -हांडेवाडी येथील विघ्नहर्ता हौसिंग सोसायटी च्या पार्किंगमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीत 6 मोटरसायकल तसेच 1 रिक्षा पूर्ण जळाली असून  2 मोटर सायकल (Pune news)अर्धवट जळाल्या.

याबाबत माहिती देताना बोराटेनगर अग्निशमन केंद्राचे अनिल गायकवाड यांनी सांगितले की ,जेएसपीएम ग्रुप च्या सिग्नेट पब्लिक स्कुलच्या पाठी मागे असलेल्या विघ्नहर्ता हौसिंग सोसायटी च्या पार्किंग मध्ये पार्क केलेल्या वाहनांना आज रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. या आगीमध्ये 6 मोटरसायकल आणि 1 रिक्षा पुर्ण जळाले तर 2 मोटर सायकल अर्धवट जळाले. ही वाहने इमारतीच्या ग्राउंड फ्लोअर वरती पार्क केलेली होती.

Pimpri News: पिंपरी चिंचवड शहर पोलीस भरतीसाठी 15 हजार अर्ज

अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच लोकांनी वाळू व पाणी टाकून आग आटोक्यात आणली होती. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पाणी मारून तेथे कुलिंग केले जेणेकरून आग परत ( Pune news )भडकू नये.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.