Pune News : आचारसंहितेमुळे पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या जमा !

एमपीसी न्यूज – पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या चारचाकी वाहने जमा करण्यात आल्या आहेत. दरम्यान सायंकाळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दुचाकीवरून निवासस्थानापर्यंत प्रवास केला.

राज्य निवडणूक आयोगाकडून पाच विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. त्यामध्ये औरंगाबाद पदवीधर, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक, पुणे शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघातही निवडणूक होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी शासकीय वाहने जमा करणे बंधनकारक आहे.

महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, प्रभाग अध्यक्ष, विविध विषय समित्यांच्या सभापतींनी शासकीय वाहने जमा केली आहेत. खासगी गाड्यावरील नामफलक झाकणे बंधनकारक आहे. येत्या 3 डिसेंबर 2020 पर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.