Pune News : गैरप्रकार करून परीक्षा कशी द्याल हे सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पुणे विद्यापीठाची पोलिसात तक्रार

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेत गैरप्रकार कसे करता येतील, ही परीक्षा अवैधरित्या कशाप्रकारे देता येईल, याची माहिती देणारा 7 मिनिट 32 सेकंदाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विद्यापीठाच्या वतीने चतु:शृंगी पोलिसात तक्रार देण्यात आली असून हा व्हिडीओ व्हायरल करणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सध्या ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा सुरू आहे. अडीच लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यातील दोन लाख विद्यार्थी ऑनलाइनद्वारे परीक्षा देणार आहेत. त्यादृष्टीने विद्यापीठाने संपूर्ण तयारीही केली आहे.


दरम्यान सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये परीक्षा कशी द्यावी, याविषयी माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओतून विद्यापीठ आणि विद्यापीठासाठी काम करणाऱ्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे प्रचलित कायद्याचा भंग झाला असून अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र विद्यापीठाच्या वतीने चतु:शृंगी पोलिसांना देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.