Pune News : गौरी सजावट स्पर्धेत विद्या ढवारे प्रथम

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचे सण उत्सव देखील ऑनलाइन पद्धतीने साजरे होत आहेत. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सोन्याची माणसं प्रतिष्ठान पुणेच्यावतीने गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या ऑनलाईन डिजिटल स्पर्धेत अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. स्पर्धेत प्रथम क्रमांक विद्या हनुमंत ढवारे यांनी पटकावला.

द्वितीय क्रमांक सुरेखा येनपुरे, तृतीय क्रमांक मेघा सिन्नरकर, तर उत्तेजनार्थ बक्षीस रोहिणी वाल्हेकर यांना मिळाले.

तसेच या वर्षीचा यशस्वी उद्योजिका पुरस्कार सारिका कामेरी यांना देण्यात आला.

यावेळी भाजपाचे युवा नेते संदीप बेलदरे पाटील, सोन्याची माणसं प्रतिष्ठान’च्या संस्थापक अध्यक्षा सोनाली नाशिककर, सन ब्राईट स्कूलच्या अध्यक्षा शुभांगी बेलदरे, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे फौजदार महेंद्र पाटील, संस्थेचे कोषाध्यक्ष अभिषेक मिसाळ, साई नाशिककर, विजया काचावार आणि सोनाई ज्वेलर्सचे सतीश शहाणे आदींच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत नाहीत. त्यामुळे यावर्षी जास्तीत जास्त ऑनलाइन स्पर्धा घेण्यावरच भर देण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.