Pune News : कमांड हॉस्पिटलमध्ये 5000 बेड उपलब्धतेचा व्हायरल मेसेज खोटा

एमपीसी न्यूज – पुण्यातील कमांड हॉस्पिटलमध्ये 5 हजार कोविड बेड उपलब्ध असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल मेसेज खोटा असल्याचे लष्कराच्या जनसंपर्क विभागाने म्हंटले आहे.

पुण्यात कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. त्याच वेगाने सोशल मीडियावर फेक मेसेज देखील पसरत आहेत. कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय हे मेसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड केले जात आहेत. असाच एक मेसेज पुण्यातील कमांड हॉस्पिटलबाबत व्हायरल होत आहे. यामध्ये कमांड हॉस्पिटलमध्ये 5000 कोविड बेड उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. दरम्यान हा मेसेज खोटा असल्याचे लष्कराच्या जनसंपर्क विभागाने म्हंटले आहे.

सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवली जात आहे त्याबाबत नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन लष्कराच्या जनसंपर्क विभागाने केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.