Pune News : वाघापूर ते शिंदवणे मार्ग आजपासून वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज -पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे ते जेजुरी या राष्ट्रीय मार्ग क्रमांक 117 या रस्त्याचे मजबुतीकरण (Pune News) आणि शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे काम सुरु असल्याने आजपासून (दि.24) वाघापूर ते शिंदवणे मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.

 

Pune Crime News : मारहाण करून हत्याराचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुबाडले ; 47 लाखांची रोकड लंपास

 

या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी येत्या 29 एप्रिलपर्यंत म्हणजेच सुमारे 35 दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील वाहतूक बंद करून बंदच्या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक ही सासवड- पिसर्वे-टेकवडी-बोरीऐंदी आणि सासवड-वाघापूर चौफुला-माळशिरस-यवत या मार्गे वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी वाघापूर ते शिंदवणे मार्गावरील (Pune News) वाहतूक कोंडी आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.