Pune News: ‘खडकवासला’तील विसर्ग 11 हजार 704 क्युसेक कायम

मागील वर्षी आजच्या दिवशी 28.48 टीएमसी म्हणजेच 97.71 टक्के पाणीसाठा होता. ही आकडेवारी सोमवारी (दि.31) सकाळी 6 पर्यंतची आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली.

एमपीसी न्यूज – खडकवासला धरणातून सुरु असलेला मुठा नदी पात्रातील विसर्ग 11 हजार 704 क्युसेक कायम असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत पावसाची हजेरी कायम आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी चारही धरणांत जोरदार पाऊस सुरू आहे. यातील 3 धरणांत 100 टक्के पाणीसाठा आहे. तर, चौथे धरणही लवकरच 100 टक्के भरणार आहे.

‘खडकवासला’तून यंदाच्या मोसमात आजवर 9.95 टीएमसी इतके पाणी विसर्गाच्या माध्यमातून मुठा नदी पात्रात सोडले असून ‘खडकवासला’, ‘पानशेत’ आणि ‘वरसगाव’ पूर्ण क्षमतेने तर टेमघर धरण भरण्याच्या मार्गावर आहे. हे पाणी पुणेकरांना 6 ते 7 महिने पुरले असते.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात 1.97 टीएमसी (100 टक्के), पानशेत 10.65 टीएमसी (100 टक्के), वरसगाव 12.82 टीएमसी (100 टक्के), टेमघर 3.44 टीएमसी (92.84 टक्के) असा चारही धरणांत एकूण 28.88 टीएमसी म्हणजेच 99.09 टक्के पाणीसाठा आहे.

मागील वर्षी आजच्या दिवशी 28.48 टीएमसी म्हणजेच 97.71 टक्के पाणीसाठा होता. ही आकडेवारी सोमवारी (दि.31) सकाळी 6 पर्यंतची आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज दिली.

तर, यंदा मागील वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा धरणांत झाला आहे. तरीही, कोंढवा, लुल्लानगर, खाडी मशीन चौक, सुखसागरनगर, मार्केटयार्ड चौकात पाणी मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.