Pune News : पुण्यातील ‘या’ भागात गुरूवारी पाणी पुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज – वडगाव जलकेंद्र व लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारितील रामटेकडी टाकीवरील विद्युत व पंपींग विषय तसेच, बांधकाम विषयक तातडीची दुरूस्तीची कामे करायची असल्यामुळे उद्या (गुरूवार, दि.09) सिंहगड रोड, धनकवडी, कात्रज तसेच हडपसर परिसरातील पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे. तर, शुक्रवारी (दि.10) सकाळी उशिरा व कमी दाबाने या भागात पाणीपुरवठा होणार आहे.

गुरूवारी खालील भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

वडगाव जलकेंद्र परिसरातील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

रामटेकडी टाकीवरून पाणी पुरवठा होणाऱ्या हडपसर, काळेपडळ, महंमदवाडी, सय्यदनगर, गोंधळेनगर, बीटीक्रवडे रोड, सातववाडी, आकाशवाणी, वैदुवाडी, साडेसतरा नळी आदी भागातील पाणीपुरवठा यादिवशी बंद राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.