_MPC_DIR_MPU_III

Pune News : ‘आम्ही वडगावचे डॉन’; हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणा-या टोळक्याविरोधात गुन्हा

पोलिसांनी अज्ञात पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एमपीसी न्यूज – हातात कोयते घेऊन गाड्यांची तोडफोड करत तसेच आरडाओरडा करून दहशत निर्माण करणा-या टोळक्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_IV

याप्रकरणी तुषार शेलार (वय 30, रा. रायगडनगर, वडगाव-बुद्रुक, पुणे ) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पाच ते सहा जणांच्या टोळीने रविवारी (दि.13) रात्री एकच्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील भैरवनाथ मंदिरा समोर तसेच, शेवंताबाई दांगट पाटील कमान शेवटचा बस स्टॉप, ऋतुंभरा सोसायटी, किर्ती नगर व फनटाईम इकडे जाणा-या कॅनॉल रोड या ठिकाणी आरडाओरडा करत गाड्यांची तोडफोड केली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेलार यांना रविवारी रात्री एकच्या सुमारास मुलांचा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी घराबाहेर येऊन पाहीले तर भैरवनाथ मंदिरा समोर पार्क केलेली त्यांची पांढ-या रंगाच्या गाडीजवळ पाच ते सहा मुले हातात कोयते घेऊन मोठ-मोठ्याने ओरडून लोकांना उद्देशून धमकी देत असल्याचे दिसून आले.

‘आम्ही वडगाव भागाचे डॉन असून, आमच्या नादाला कोणी लागु नका’ अशी धमकी देत दहशत निर्माण केली. या टोळक्याने फिर्यादी शेलार यांची गाडी व शेजारी लावलेल्या गाड्या फोडल्या.

पोलीस अधिक तपास करत आहेत.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.