Pune News : सार्वजनिक वाहतुकीची समस्या सर्वजण मिळवून सोडवू : प्रा.डॉ. नितीन करमळकर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पीएमपीएमएल यांच्यात सामंजस्य करार

एमपीसीन्यूज : समाजाचे प्रश्न जाणून घ्यायचे असतील तर समाजात जाऊन ते सोडवायला हवेत. सार्वजनिक वाहतुकीतील समस्या जाणून घेत त्यावर उपाय शोधण्याचे काम आपण सर्वजण मिळून करूया, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पीएमपीएमएल यांच्यात 30 जुलै रोजी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, अधिसभा सदस्य संतोष ढोरे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर, समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती तांबे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ.अनघा तांबे, पीएमपीएमएलचे अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा आदी उपस्थित होते.

 प्रा. डॉ. नितीन करमळकर म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिका, स्मार्ट सिटी यांच्याबरोबर विद्यापीठाने अनेक समाजभिमुख कामे केली आहेत. ‘पीएमपीएमएल’च्या या अभ्यासातून प्रश्नांची सूची तयार करण्यात येईल. त्यातून हॅकेथॉनच्या माध्यमातून समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.

लक्ष्मीनारायण मिश्रा म्हणाले, ‘ट्रान्सपोर्ट फॉर ऑल’ या संकल्पनेतून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे विद्यापीठाकडून होणाऱ्या अभ्यासातून आम्हाला नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यातील अडचणी सोडवणे शक्य होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.