Pune News : पुरुषांच्या बाजूने कधी कायदे करणार- ज्योतिषाचार्य अतुल छाजेड

एमपीसी न्यूज : धनंजय मुंडे प्रकरणाचा संदर्भ देऊन काही महिला कायद्याचा गैरवापर करून पुरुषांना बदनाम करत आहेत. तसेच या कायद्यांमध्ये काही बदल होणार आहेत का आणि पुरुषांच्या बाजूने असे कायदे कधी होणार आहेत, असे प्रश्न पत्रामार्फत ज्योतिषाचार्य अतुल छाजेड यांनी सर्वोच्च न्यायाधीशांना विचारले आहेत.

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध एका महिलेने बलात्काराची तक्रार दाखल केली आणि काही काळाने ही तक्रार मागेदेखील घेतली. याचाच अर्थ हे आरोप खोटे होते आणि या महिलेने पुढे ते मान्यदेखील केले आहे. याचप्रकारे किडनॅपचे आरोपदेखील खोटेच निघाले आहेत. अशा प्रकरणांत या महिलांवर कायद्याने काय कारवाई केली जाते? आणि या महिलेवर काय कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती आम्हाला मिळावी, असेही त्यांनी  विचारले आहे..

या पत्राची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय कायदेमंत्री, राष्ट्रपती, धनंजय मुंडे व पोलीस कमिशनर यांना देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.