Pune News : शहरात 24 तास पाणी मिळत असताना हडपसरवर अन्याय का ? -योगेश ससाणे

एमपीसी न्यूज – धरणांत पाणी आहे, मात्र, हडपसर परिसरातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी आज महापालिकेच्या ऑनलाइन सभेत निक्षून सांगितले.

16 सप्टेंबर आणि सोमवार पर्यंत पाणीपुरवठा वाढविणार असल्याचे आश्वासन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिले होते. मात्र, ते पाळण्यात आले नाही. हडपसरची बोंबाबोंब सुरू आहे.

नागरिकांना प्यायला पाणी नाही. सकाळी सहापासून पाण्यासाठी नागरिकांचे फोन सुरू आहेत. शहरात 24 तास पाणी मिळत आहे, पण आम्हाला अर्धा तासही पाणी मिळत नाही. 8 दिवस द्यायला सांगितले होते. 15 दिवस झाले पण पाणी मिळत नसल्याचे ससाणे यावेळी म्हणाले.

_MPC_DIR_MPU_II

7 ते 8 लाख नागरिकांच्या जिव्हाळ्याचा हा प्रश्न आहे. शहरात 24 तास पाणी मिळत असताना हडपसरवर अन्याय का करता, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. धरणे 100 टक्के भरलेली असताना असमान पाणीपुरवठा होत आहे. आम्हाला चांगल्या दाबाने पाणीपुरवठा कधी होणार, त्याचा अधिकाऱ्यांना खुलासा करू द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नगरसेवक पाण्यासाठी बोलतातयेत मात्र तुम्ही सभा कधी तहकूब करायची यावर चर्चा करीत आहात, हे बरोबर नसल्याचे स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप म्हणाले.

तर, राज्य शासनाचे सभा चालविण्याचे आदेश नाहीत. त्यामुळे महापौरांच्या दालनात चर्चा करू, असे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी सांगितले. त्यानंतर तातडीने सभा तहकूब करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.