Pune News : दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे का बोलला नाहीत? : छगन भुजबळांचा सेलिब्रेटींना सवाल

एमपीसी न्यूज : कॅनेडाचे पंतप्रधान आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी शेतकरी आंदोलनावर ट्विटद्वारे पाठिंबा दिल्यानंतर भारतातील सेलिब्रिटी आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगत ट्विट करत आहेत. थंडीत कोरोना काळात दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे का बोलला नाहीत, असा सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारातील आयुका येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री भुजबळ म्हणाले, केंद्राच्या तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी कडाक्याच्या थंडीत कोरोनाच्या संकटकाळात हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांच्या आंदोलनाची दखल जागतिक पातळीवर घेतली जात असून आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेत्यांसह सेलिब्रिटी ट्विटद्वारे पाठिंबा देत आहेत. त्यानंतर लगेचच काही भारतीय सेलिब्रेटी ‘हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे तसेच आमचा घरगुती मुद्दा असल्याचे सांगत जागतिक सेलिब्रिटींविरोधात भुमिका मांडत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

मी त्यांच्याशी सहमत आहे पण मग घरगुती मुद्दे सोडविण्यासाठी गेल्या दोन महिन्यात भाष्य का केले नाही. ‘असा टोमणा अप्रत्यक्षरित्या कंगना राणावत आणि सचिन तेंडुलकर यांना भुजबळ यांनी लागवला.

आंदोलकांना रोखण्यासाठी रस्त्यांवर सिंमेट क्राँकिटने खिळे तसेच भिंती बांधण्यावर तुमचं मत काय यावर बोलताना भुजबळ म्हणाले, असेच खिळे आणि भिंती चीनच्या सीमरेषेवर बांधल्या असत्या तर चीनने गावं वसवली नसती, पाकिस्ताननेे घुसखोरी केली नसती, अशी टीका त्यांनी केंद्र सरकारवर केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.