Pune News: बलात्कार प्रकरणातील पतीच्या जामिनासाठी पत्नीचा पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी​ न्यूज ​- बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या पतीला जामीन मिळावा यासाठी पोलिसांनी अहवाल द्यावा अशी मागणी करत एका महिलेने येरवडा पोलिस स्टेशनच्या आवारातच अंगावर डिझेल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. येरवडा पोलीस स्टेशनच्या आवारात हा प्रकार घडला. 29 वर्षीय महिला विरोधात याप्रकरणी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, या महिलेच्या पतीची एका बलात्कार आणि विनयभंगाच्या प्रकरणात जामीन बाबत सुनावणीची तारीख आहे. या आरोपीला जामीन देण्यात यावा, अशी मागणी करण्यासाठी ही महिला बुधवारी सायंकाळी येरवडा ​पोलीस स्टेशनमध्ये आली होती. यावेळी तिने एका बाटलीमध्ये लपवून आणलेले डिझेल अंगावर ओतून घेतले आणि पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार घडल्याचे लक्षात येताच पोलीस स्टेशनमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी ड्युटीवर हजर असणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने संबंधित महिलेला आत्महत्येपासून परावृत्त केले.​ महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बनसोडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.