Pune News : पुण्यात भाजपला हरवण्यासाठी वंचितसोबत येणार का राष्ट्रवादी?

एमपीसी न्यूज : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांची (Pune News) आठ दिवसांपूर्वीच युती झाली. या युतीनंतर पहिल्यांदाच प्रकाश आंबेडकर यांची आज पुण्यात सभा आहे. ही सभा खडकवासला मतदार संघातील कोल्हेवाडी परिसरात आहे. या सभेनंतर राष्ट्रवादी देखील वंचितसोबत युती करणार का? अशी चर्चा सुरू आहे.

खडकवासला मतदार संघातील वंचितचे कार्यकर्ते सभेची तयारी करत आहेत. या सभेला शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि वंचित एकत्र येणार का? याची अद्याप केवळ चर्चा सुरू आहे. सध्या त्यांच्या युतीचे कोणतेही संकेत नसले, तरी जर ही युती झाली तर बारामतीला त्याचा जास्त फायदा होणार आहे.

Pune News : पुणेकरांना वंदेभारत एक्स्प्रेसचा प्रवास घडणार

कारण 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत खडकवासला व दौंडमधील (Pune News) उमेदवार हे फार कमी फरकाने पराभूत झाले होते. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघातील भाजपचे वाढणारे मतदान रोखण्यासाठी भाजप विरोधी पक्ष कदाचित  एकत्र येण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.