Pune News : जपानमधील जायका कंपनीच्या अनुदानातून मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्प राबवणार

एमपीसी न्यूज – नद्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेकडून केंद्र शासनाच्या माध्यमातून जपानमधील जायका कंपनीच्या अनुदानातून मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात अली असून लॉकडाऊनमुळे कंपन्यांना निविदा भरता येणे शक्य नसल्याने कंपन्यांनी मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार, निविदेला 1 महिन्याची मुदतवाढ दिली असून आता 31 मेपर्यंत निविदा भरण्याची मुदत असणार आहे.

महापालिकेकडून 2016 पासून या प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे, राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत हा प्रकल्प जायका कंपनीच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून त्यासाठी केंद्राकडून 991 कोटींचे कर्ज महापालिकेस मिळणार आहे. या योजनेंतर्गत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी 11 ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. परंतु महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे हा प्रकल्प निविदेच्या प्रक्रियेतच अडकून पडला आहे.

प्रकल्पसाठी वर्षभरापूर्वी राबवलेली निविदा वादग्रस्त ठरल्याने महापालिकेने प्रकल्पाचा सुधारित आराखडा करून नवीन खर्चास नुकतीच मान्यता दिली होती. त्यानुसार, या प्रकल्पाचा खर्च 1,231 कोटींवर गेला असून देखभाल दुरुस्तीचा खर्च 250 ते 300 कोटी आहे. त्यानुसार, 1 मार्च रोजी या प्रकल्पासाठी निविदा राबविण्यात आली होती. तसेच निविदांसाठी 60 दिवसांची मुदत दिली होती.

या निविदा महापालिकेकडून ऑफलाइन ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे इच्छुक कंपन्यांना त्याचे संच महापालिकेतून घेऊन जायचे होते. महापालिकेने दिलेल्या मुदतीत 15 ते 20 कंपन्यांनी निविदांचे संच नेले आहेत. मात्र, राज्यात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टप्प्याटप्याने, तर आता पूर्ण लॉकडाऊन असल्याने अनेक कंपन्यांना निविदा भरता आलेल्या नाहीत. परिणामी कंपन्यांनी महापालिकेस पत्र देऊन निविदांची मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. त्यास महापालिकेनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. , राज्यातील लॉकडाऊन वाढतच राहिल्यास ही मुदत आणखी तर, वाढण्याची शक्यताही प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.