Pune News : चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने गरजू रुग्णांना रेमेडिसिव्हर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने गरजू रुग्णांना रेमेडिसिव्हर इंजेक्शन स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळापासून नागरिकांना प्रत्येक प्रकारची मदत केली आहे. पोळीभाजी, किराणा सामान, मास्क, सॅनिटायझर इ. ते कोविड रुग्ण सेवा केंद्र आणि गरजवंतांना एक महिना स्वतः मानधन देऊन काम, प्लाझ्मा दानासाठी शिबिरे जी वेळेची गरज आहे ते ओळखून त्याची त्वरित पूर्तता त्यांच्याद्वारे केली गेली आहे.

_MPC_DIR_MPU_II

आता चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून रुग्णांना आवश्यक असणारे रेमीडिसिव्हर इंजेक्शन फक्त 2800/- रुपयात उपलब्ध करून देणारी व्यवस्था त्यांच्या कार्यालयात सुरु करण्यात आली आहे. रुग्णांना या इंजेक्शनसाठी फार धावाधाव करावी लागते, त्याकरिता संपर्क कार्यालयातून इंजेक्शन कोठे उपलब्ध होईल हे कळवले जाणार आहे. इंजेक्शन नसल्यास ते मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.

योग्य कागदपत्रे देऊन ती कळविलेल्या मेडिकल दुकानातून रुग्णांना उपलब्ध होणार आहेत. तरी गरजू रुग्णांनी (02025440555) चंद्रकांत पाटील संपर्क कार्यालय, कर्वे पुतळ्या जवळ, कर्वे रोड, कोथरूड येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.