Pune News: सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज: पतीसह सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला 21 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी मयत महिलेच्या पतीला अटक केली आहे.

फौजिया रिझवान खान (वय 21, रा. गणेश पेठ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी पती रिझवान खान (वय 25) याला अटक केली आहे. तर, इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी फौजिया हिच्या आईने खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वर्षांपुर्वी फौजिया व रिझवान यांचा विवाह झाला होता. विवाहानंतर ती सासरी नांदत असताना संगणमतकरून आरोपींनी घरातील कामावरून तसेच माहेरवरून दवाखाण्यासाठी पैसे आणावे आणि मुलगा होण्यासाठी तिचा सतत शारिरीक व मानिसक छळ केला. या छळाने तिला अशक्तपणा आला होता. त्यातूनच तिने जीवाचे बरे-वाईट करून घेत आत्महत्या केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.