Pune News : कार्यातून जनतेसोबत विश्वासाचे नाते तयार होते : चंद्रकांत पाटील

महेश पवळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उ्दघाटन

एमपीसीन्यूज : कार्यालय म्हणजे आपल्या हक्काची जागा असून येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे समाधान झालेच पाहिजे. तुमच्या कार्यातून जनतेसोबत तुमचे विश्वासाचे नाते तयार होते, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला.

भाजयुमो पुणे शहर उपाध्यक्ष महेश पवळे यांच्या नूतन कार्यालयाचे उदघाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, भाजयुमोचे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, नगरसेवक सुशील मेंगडे, दीपक पोटे, छाया मारणे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, राजेश येनपुरे, सरचिटणीस गणेश घोष, दत्तात्रय खाडे, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आदी यावेळी उपस्थित होते.

या प्रसंगी सियाचीन या जगातील सर्वोच्च युद्ध भूमीवर देशाच्या सिमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी ऑक्सिजन निर्मिती प्लांट स्व:खर्चातून बसविणाऱ्या सुमेधा चिधडे यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना मदतनिधीही देण्यात आला .

याचबरोबर रिक्षा चालकांना कोरोना शिटस, तसेच रिक्षा चालकांचा एक लाख रुपये किमतीचा विमा काढून त्याचे वाटप करण्यात आले.

पाटील म्हणाले, हे ठिकाण नोकरीसाठी असलेले ऑफिस न राहता कार्यालय राहिले पाहिजे. येथे येणाऱ्या प्रत्येकाचे काम झालेच पाहिजे. तरच स्थानिक नागरिकांमध्ये विश्वासाचे नाते तयार होवू शकते. भाजपा शहर अध्यक्ष मुळीक यांनी पक्षाच्या वतीने पुण्यामध्ये असलेल्या योजनांची माहिती नागरिकांना दिली. या कार्यक्रमाला कर्वेनगरमधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला व या उपक्रमाचे कौतुकही केले.

सूत्रसंचालन वैभव मुरकुटे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.