Pune News : सहकार क्षेत्रातील काम समन्वयाने चालावे – सहकार आयुक्त

एमपीसी न्यूज – भाजप पुणे शहर सहकार आघाडीच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी सहकार आघाडी पुणे शहर अध्यक्ष सचिन दांगट यांच्या नेतृत्वाखाली सहकार आयुक्त अनिल कवडे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत सहकार विभागातील विविध योजना, त्यांच्या मुदती, अडचणी यावर चर्चा करण्यात आली.

अनिल कवडे म्हणाले, ‘पुणे शहरातील अनेक गृहरचना संस्था, बॅका, पतसंस्था यातील पदाधिकारी हे सामंजस्याने आणि एकोप्याने न राहता वादविवाद करीत असतात. हे वाद मिटविण्यासाठी सहकार विभाग अथवा कोर्ट कचेरी यांची मदत घेणे हा मार्ग नाही, हे सहकार क्षेत्रात येणाऱ्या सर्वच सहकार तत्वावर चालणा-या संस्थाच्या पदाधिकारी, सभासदांनी लक्षात घेतले पाहिजे.

_MPC_DIR_MPU_II

सर्व सहकारी संस्थामधील वादविवाद स्थानिक पातळीवरच मिटवले जावेत यासाठी स्थानिक पातळीवरीलच व्यवस्था लागली गेली पाहिजे आणि या भूमिकेत सहकार आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नागरिक आणि सहकार विभाग या दोघांमधील दुवा म्हणुन काम करावे. असे, कवडे म्हणाले.

यावेळी शहराध्यक्ष सचिन दशरथ दांगट, उपाध्यक्ष गिरीश घोरपडे, अक्षयसिंह शितोळे, दिलीप पर्वतीकर, किशोर चौधरी, सरचिटणीस अजित देशपांडे, सदस्य बालाजी माने, ऋषिकेश रजावात, किरण उभे आदी मान्यवर उपस्थित होते. दांगट यांनी कार्यकारिणी सदस्यांचा परिचय करून दिला. या प्रसंगी सहकार आयुक्तांचा शाल, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.