Pune News : पेंटिंगचे काम करताना आठव्या मजल्यावरुन खाली पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – इमारतीच्या आठव्या मजल्यावर रंगरंगोटीची आणि दुरुस्तीचे काम करत असताना खाली कोसळल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने कामगाराचा जागीच मृत्यू झाला. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागानगर येथे गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.

सखाराम नाथा वगरे (वय 21) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे याप्रकरणी दशरथ वगरे (वय 40) यांनी फिर्याद दिली असून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की चंद्रभागा नगर येथील एका इमारतीच्या आठव्या मजल्यावर रंगरंगोटीचे आणि दुरुस्तीचे काम सुरु होते. हे काम सुरू असताना आरोपीने कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती साधनसामुग्री पुरवली नाही. त्यामुळे मजल्यावर काम सुरू असताना कामगार सखाराम वगरे हा टेरेसवरील लोखंडी पत्र्याला गेलेले तडे दुरुस्त करत असताना लोखंडी पत्रा तुटून खाली पडला.

यामध्ये कामगार सखाराम हादेखील आठव्या मजल्यावरून खाली कोसळला त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो मृत्युमुखी पडला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक डीगे करत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.