Pune News : वाह रे बहाद्दर ! बँकेतच केला नकली नोटांचा भरणा

एमपीसी न्यूज – एखाद्याला नकली नोटा देऊन फसवणूक झाल्याची घटना आपण ब-याच वेळा ऐकली असेल, पण बॅंकेत नकली नोटांचा भरणा करणे तसं अशक्यच. मात्र, पुण्यात एका बहाद्दराने चक्क बँकेतच नकली नोटांचा भरणा केला आहे.

ही घटना सदाशिव पेठेतील बँक ऑफ बडोदा (ई देना बँक) येथे मागील दोन वर्षात घडल्याचे उघडकीस आले आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी सुदाम उभे (वय 54, रा.भुसारी कॉलनी,कोथरूड पुणे ) यांनी विश्रारामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदाशिव पेठेतील बँक ऑफ बडोदा (ई देना बँक) या शाखेतील बँकेत कामकाजाच्या वेळेत येऊन शंभर रूपयांच्या सात नोटा अशा एकूण सातशे रुपयांच्या बनावट नोटांचा भरणा करून बँकेची फसवणूक केली.

विश्रामबाग पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.