Pune News : 14 वर्षाखालील मुलींसाठी कात्रज येथे  कुस्ती स्पर्धा

एमपीसी न्यूज- 14 वर्षाखालील   कुस्तीगीर मुलींसाठी मॅटवरील तालुकास्तरीय (Pune News) निमंत्रित ,रोख इनामाची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दिवंगत पैलवान कै. वसंतराव सयाजी बेनकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त ‘कै. वसंतराव सयाजी बेनकर प्रतिष्ठान’ तर्फे 8 एप्रिल 2023  रोजी दुपारी 1 ते 6 या वेळेत राधाकृष्ण गार्डन( आंबेगाव, कात्रज) येथे ही कुस्तीस्पर्धा होणार आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आज झालेल्या पत्रकार परिषदेत निमंत्रक वैजयंती वसंतराव बेनकर,गौरी बेनकर -पिंगळे,सारिका बेनकर- डोके, दुर्गा बेनकर-बोरावके  यांनी या स्पर्धेची माहिती दिली.  महेंद्र डोके, धनंजय बेनकर, ऋषीकेश बेनकर,कपिल बोरावके, अक्षय पिंगळे , संदीप वांजळे,एड.मंगेश ससाणे,राहुल बेनकर,सचिन बेनकर उपस्थित होते.हे सर्व स्पर्धेला  विशेष सहकार्य करीत आहेत.

 

 

Mahavitaran : थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात

 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, कुस्तीगीर कोमल गोळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण होणार आहे.पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी प्रतिक्षा बागडी यांची उपस्थिती आणि सत्कार यावेळी करण्यात येणार आहे .30ते 62 किलो दरम्यान एकूण 10 गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. 9 वाजता नोंदणी, वजन घेण्याची प्रक्रिया होईल.

 

 

आपल्या पैलवान वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या तिन्ही लेकींनी मिळून या स्पर्धेचे  आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 1 लाख रुपयांची पारितोषिके,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रे  देण्यात येणार आहेत .  संपूर्ण पणे महिला साठी सर्व गटामध्ये होणारी एकमेव स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जात  आहे. तालुका स्तरीय स्पर्धा असली तरी या स्पर्धत अनेक चांगल्या कुस्तीगीरांची कुस्ती पाहण्याची संधी पुणेकरांना वसंतराव बेनकर प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे. या सुवर्ण संधीचा फायदा सर्व पंचक्रोशीतील लोकांनी घ्यावा व याचा आनंद घ्यावा, असे आवाहन निमंत्रक वैजयंती वसंतराव बेनकर यांनी केले.
          सामाजिक बांधिलकीचे जपणूक करण्यासाठी या कुस्ती स्पर्धेसाठी त्यांचा एकच उद्देश आहे की, आपल्या भागातील महिला कुस्तीगीर यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळवून देणे व अशा स्पर्धेतून भावी ऑलिम्पिकपटू जागतिक विजेती राष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत ,हाच  उद्देश व पैलवान वडिलांना हीच खरी आदरांजली असे या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार (Pune News) परिषदेत सांगण्यात आले.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.