Pune News : हिंदू जनजागृती समितीच्या वतीने पुण्यात शिक्षकांसाठी योग शिबीर

एमपीसी न्यूज   – हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सामाजिक जाणीव जोपासली जावी आणि समाजाला त्याचा अधिकाधिक लाभ व्हावा या उद्देशाने ( Pune News ) आरोग्य तपासणी,मंदीर स्वच्छता,गरजूंना अन्नदान, शालेय साहित्य वाटप अश्या प्रकारचे विविध उपक्रम नियमितपणे घेतले जातात. याचाच एक भाग म्हणून विद्याश्रम शाळा, तागुंदे क्लासिक वारजे, माळवाडी वारजे येथे शाळेतील शिक्षकांसाठी शनिवारी (दि.4)  योग शिबिर घेण्यात आले.

 

Vadgaon Maval News : तिकोनागडाची झाली वणवा पूर्व तयारी

 

 

या शिबिरात योगशिक्षिका  निशिगंधा मेहंदळे यांनी योगाचे महत्त्व तसेच सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ‘शारीरिक आजार आणि आपले आरोग्य योगाच्या माध्यमातून निरोगी कसे ठेऊ शकतो?’ या विषयावर मार्गदर्शन केले.

 

तसेच सध्या होणारे आजार सर्वाइकल्स स्पॉंडिलायसिस, मायग्रेन, पचनशक्तीचे आजार यावर कोणते आसन करून त्रासापासून मुक्त होऊ शकतो हेही करून दाखवले.शिक्षकांनीही आपल्या शंका विचारून त्यांचे निराकरण करून घेतले तसेच उपयुक्त मार्गदर्शन केल्याविषयी समितीचे आभार मानले. या उपक्रमाचा लाभ 19 शिक्षकांनी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.