Pune News : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज – पुण्यात राहून स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. वैभव शितोळे असं या तरुणाचं नाव आहे.

वैभव हा मूळचा श्रीगोंदा तालुक्यातील होता. 2015 पासून तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचार सुरु असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला.

वैभव हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. परंतु प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय बाळगून त्याने 2015 पासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला होता. काही परीक्षा मध्ये तो मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याने मुलाखतही दिली होती. पुण्यात राहून तो अभ्यास करत होता. 16 मार्च रोजी कोरोनाची लक्षणे दिसत असल्यामुळे तो ससून रुग्णालयात अ‍ॅडमिट झाला होता. मात्र उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला.

11 तारखेची एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
येत्या 11 एप्रिल रोजी एमपीएससीची परीक्षा होणार आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून होत आहे. कारण पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचा फटका बसला आहे. काही विद्यार्थ्यांना तर कोरोनाची बाधाही झाली आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.