Pune Crime News : गाडी सर्व्हिसिंगला घेऊन गेलेल्या तरुणाची डोक्यात वार करून हत्या 

एमपीसी न्यूज – दुचाकी गाडीचे सर्व्हिसिंग करण्यासाठी गाडी गॅरेजवर घेऊन गेलेल्या तरुणाला तीन अनोळखी इसमांनी डोक्यात वार करून ठार केले आहे. हि घटना शनिवारी (दि. 26) दुपारी साडेतीनच्या सुमारास पिसोळी येथील जगदंबा भवन रोडवरील बालाजी गॅरेज समोर घडली.

सागर दादा औताडे (वय 23, रा. औताडेवाडी, पुणे ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी गॅरेज मालक पुरुषोत्तम मंडावळे (वय 25, रा. वडाची वाडी रोड, उंड्री, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तीन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सागर हा आपल्या दुचाकी गाडीचे सर्व्हिसिंग करण्यासाठी गाडी घेऊन पुरुषोत्तम मंडावले यांच्या गॅरेजवर आला होता. यावेळी त्याठिकाणी आलेल्या तीन अनोळखी इसमांनी सागर यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सागरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.