Pune News : यंग नॅचरलिस्ट नेटवर्कतर्फे डॉ. पी. एन. कदम यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

एमपीसी न्यूज – दक्षिण आशियातील वैद्यकीय संशोधनामध्ये व्यापक आणि समर्पक कामासाठी पुण्यातील प्रसिद्ध वैद्यकीय व्यावसायिक डॉ. पी. एन. कदम यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणा-या यंग नॅचरलिस्ट नेटवर्कतर्फे हा लाईफटाइम अ‍ॅचिव्हमेंट अवार्ड जाहीर करण्यात आला आहे. 

गेल्या दीड दशकातील डॉ. कदम यांच्या वैद्यकीय सेवेतील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करताना जास्त आनंद होत असल्याची भावना यावेळी यंग नॅचरलिस्ट नेटवर्कचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस डॉ. अमित दत्ता पत्राद्वारे व्यक्त केली.

गेली 23 वर्षे सांसर्गिक आणि असांसर्गिक रोगाविषयी वेगळा दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी एका प्रकल्पावर काम करत आहे. एकात्मिक वैद्यकिय प्रणालीचा विकास हे माझं स्वप्न आहे. गेली एक दशकाहून अधिक काळ ‘आहार हेच औषध’ याविषयी केलेल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये घेतली गेली याचा आनंद होत असल्याचे डॉ. कदम म्हणाले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे यंग नॅचरलिस्ट नेटवर्क पर्यावरण, हवामान बदल, जैवविविधता, जमीन, जैव सुरक्षा, मानव विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, तरुण आणि महिला सशक्तीकरण, नवीन उद्योजकांना प्रोत्साहित करत आहे. युनायटेड नेशन सिस्टीम संघटनाबरोबर गेल्या 10 वर्षांपासून अधिकृतपणे सल्लामसलत करत आहे. त्याचबरोबर राष्ट्रकुल आणि इतर आंतरराष्ट्रीय सरकारी संस्थाबरोबर हे नेटवर्क कार्यरत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.