Pune News: अवैधरित्या गुटखा विक्री करणारा व्यापारी जेरबंद

छाप्यात आरोपीकडून 83 हजार 982 रुपये किंमतीचा विमल गुटखा, तुलसी, व्हिवन, आरएमडी व इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.

एमपीसी न्यूज – लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त सिगारेट, तंबाखू व इतर अमंली पदार्थ विक्री करण्यावर बंदी होती. अशी विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. पुण्यातील विमलाई बिल्डिंग, काळे पडळ येथे अवैधरित्या घरात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवून त्याची विक्री करणा-या तरूण व्यापा-याला पुणे पोलिसांनी छापा घालून अटक केली आहे. गुन्हे शाखा युनिट एकने मंगळवारी ही कारवाई केली.

बिंजाराम ऊर्फ विजय गणेश देवासी (वय 24, रा. विमलाई बिल्डिंग, काळे पडळ, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी देवासी हा अवैधरित्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडे बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.

_MPC_DIR_MPU_II

देवासी अवैधरित्या विक्री करत असल्याची खात्री पटताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. छाप्यात आरोपीकडून 83 हजार 982 रुपये किंमतीचा विमल गुटखा, तुलसी, व्हिवन, आरएमडी व इतर तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले.

देवासी याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात अवैध गुटखा विक्री प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लष्कर न्यायालयात हजर करण्यात आले त्यांनी आरोपीला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ही कारवाई गुन्हे शाखा पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट – एक गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी सचिन जाधव, संजय बरकडे, प्रशांत गायकवाड, बंडू शिंदे, सतीश वणवे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.