University News : 5,659 जागांसाठी तब्बल 27,000 अर्ज; विद्यापीठात प्रवेशासाठी चढाओढ

विद्यापीठातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेची अभ्यासपूर्वक तयारी करावी लागणार आहे. : 27,000 applications for 5,659 seats; Struggle for admission in Savitribai Phule Pune University

एमपीसी न्यूज – या वर्षी सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची क्षमता 5 हजार 653 इतकी असून त्यासाठी एकूण 27 हजार 787 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेची अभ्यासपूर्वक तयारी करावी लागणार आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागात पदव्युत्तर अभ्यासक्रमासह अनेक पदवी व पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा समावेश आहे. त्यासाठी दि.10 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. पदवी व पदव्युत्तरची प्रवेश क्षमता 3 हजार 353 इतकी आहे.

त्यासाठी एकूण 22 हजार 467 एवढे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी जवळपास 16,000 अर्ज हे विज्ञान व तंत्रज्ञान या शाखेच्या प्रवेशासाठी करण्यात आले आहेत.

पदवी व पदव्युत्तरसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा विद्यार्थ्याना ऑनलाइन देता येणार आहे. त्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर प्रवेश दिले जाणार आहे.

दरम्यान, बॅचलर ऑफ व्होकेशनल (बी.व्होक), बीए लिबरल आर्टस, संगीत, नृत्य, नाटक यासह अत्य पदवी अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठातर्फे येत्या 16 ऑगस्ट रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.