Pune News: मास्क न वापरणाऱ्यांवर 500 व रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर 1 हजार रुपये दंड आकारा : सौरभ राव

कोरोना (कोविड-19) संसर्गजन्य आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून हा दंड आकारावा, असे विभागीय आयुक्त राव यांनी म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – कोरोना या संसर्गजन्य आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांना 500, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकतांना आढळल्यास 1 हजार रुपये दंड आकारन्याचे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी दिले आहे.

कोरोना (कोविड-19) संसर्गजन्य आजाराबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून हा दंड आकारावा, असे विभागीय आयुक्त राव यांनी म्हटले आहे. पुणे जिल्हयातील पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण भागात मोठया प्रमाणात कोरोना (कोविड 19) या संसर्गजन्य रोगाचा फैलाव वाढतो आहे.

या संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना, फिरतांना आपल्या तोंडावर मास्क घालणे आवश्यक आहे. तथापि, अशा प्रकारे मास्क न घालता नागरिक फिरतांना दिसतात. अशा नागरिकांमुळे कोरोना संसर्गजन्य आजाराचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकरता येत नाही.

दंडाची रक्कम वसूल करण्याचे अधिकार पोलीस, पोलीस मित्र, आरोग्य सेवक, महापालिका कर्मचारी यांना देण्यात आले असल्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.