Pune News : भामा आसखेड प्रक्रल्पामुळे टँकर माफियांचं कंबरडं मोडलं ! : उपमुख्यमंत्री अजित पवार

एमपीसी न्यूज : शहराच्या पूर्व भागातील 12 ते 15 लाख नागरिकांची तहान भागविणाऱ्या भामा आसखेड धरण प्रकल्पामुळं अनेकांच्या पोटात दुखत असेल, असा जोरदार टोमणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला.

पुणे महापालिकेच्या मुख्य सभागृहात भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाचा ऑनलाईन लोकार्पण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

पवार म्हणाले, गेल्या 15 वर्षांपासून भामा आसखेड धरणाचं काम सुरू आहे. काही वर्षांपुर्वी शहराच्या पूर्व भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. ज्या वेळी भामा आसखेड धरण जे मुळात दौंड आणि हवेलीसाठी प्रस्तावित होतं, ते पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी बांधण्याचे निश्चित केले. तेव्हा अनेकांच्या पोटात दुखलं, टँकरमाफियांना तर ही कुठून अवदसा सुचली असंच वाटत होतं.

या धरणामुळं पाणी टँकर माफियांचं कंबरडं मोडणार हे नक्की, असा अप्रत्यक्ष टोला यावेळी लगावला.

दरम्यान, याप्रसंगी टँकरलॉबी चालविणारे माजी आमदार आणि नगरसेवक देखील उपस्थित होते, त्यांच्यावर ही टिका केल्याची चर्चा रंगली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.