Pune News : बॉम्बची अफवा पडली महागात, पुणे विमानतळावरुन जम्मूच्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – बॅगेत बॉम्ब असल्याची अफवा पसरवणे जम्मू काश्मीरचा रहिवासी असणा-या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पुणे पोलिसांनी आज (रविवारी) सकाळी या तरुणाला पुणे विमानतळावरुन अटक केली आहे. अटक तरुण विधी (लॉ) अभ्यासक्रमाचा द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे.

 

मानिक प्रताप सिंह (वय 21, रा. गांधीनगर, जम्मू, सध्या रा. भुगाव, पुणे) असे अटक तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिमरन आंम्बुळे (वय 20) यांनी फिर्याद दिली.मिळालेल्या माहितीनुसार, मानिक प्रताप सिंह दिल्लीला जाणा-या विमानात चढत असताना हि घटना घडली. विमानतळावर ज्यावेळी जवळ तीक्ष्ण, तरल पदार्थ अथवा आगपेटी आहे का ? अशी विचारणा करण्यात आली त्यावेळी माझ्याकडे बॉम्ब असल्याचे सिंह म्हणाला. फिर्यादी आंम्बुळे यांनी तात्काळ CISF यांच्या कडे तक्रार केली, तिथून त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात सोपविण्यात आले.

वारंवार सुरक्षा तपासणीचा त्रास झाल्याने आलेल्या रागातून असे बोलल्याचे तरुणाने सांगितले. दरम्यान तरुणाविरोधात भारतीय दंड विधान कलम 182, 501 (1) (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.