Pune News : विकासकामे मार्गी लावण्यासाठी सर्व पक्षीय बैठक बोलवा : दीपाली धुमाळ

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीही प्रशासनाला निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. पण, महापालिका प्रशासन काहीही हालचाल करीत नसल्याचे चित्र आहे.

एमपीसी न्यूज – मागील 5   महिन्यांपासून कोरोनाचे संकट अतिशय गंभीर झाले आहे. त्याचा फटका पुणे महापालिकेच्या विकासकामांनाही बसला आहे. त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी तातडीने सर्व राजकीय पक्षनेत्यांची बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला कोरोना संदर्भात आढावा घेत आहेत. अनेक महत्वपूर्ण सूचनाही करीत आहेत. मात्र, पुणे महापालिकेला कोरोना रोखण्यात अपयश येत आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा होणे गरजेचे असल्याचे दीपाली धुमाळ यांनी सांगितले.

पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण एक लाखांच्यावर गेले आहेत. 90 हजारांपेक्षा जास्त रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर मात केली आहे. 16 हजार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

तर, अडीच हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. शहरात विकासकामे सुरू करण्याची सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांची मागणी आहे.

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनीही प्रशासनाला निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. पण, महापालिका प्रशासन काहीही हालचाल करीत नसल्याचे चित्र आहे. सध्या कोरोनाचे कारण पुढे करून अधिकारी काम करीत आहेत.

कोरोनामुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे. हेमंत रासने यांचे महसूल वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे जीएसटी आणि शासनाचे अपेक्षित अनुदान काही मिळत नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.