Pune News : कोविडच्या प्रचंड उद्रेकात देखील ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगच्या मागणीत वाढ

अ‍ॅनिमेशन उद्योग हे एक भरभराटीचे क्षेत्र आहे आणि पुढील दोन-तीन वर्षांत ते इतरांपेक्षा सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र असेल.

एमपीसीन्यूज : जगभरात झालेल्या कोविड -19 च्या उद्रेकानंतर ॲनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग या क्षेत्रातील मागणीत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. मात्र, जागतिक पातळीवर माध्यम आणि करमणुकीसह विविध क्षेत्रांच्या व्यवसायावर परिणाम झाला. तसेच टीव्ही गेम्स, डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वापरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

करोनाच्या महामारीमुळे उद्भवलेल्या या चार महिन्यांच्या लॉकडाऊन कालावधीत लाखो लोकांना बालपणी ते घरात बसून खेळत असलेल्या लुडो, रम्मी आणि इतर बर्‍याचशा खेळाकडे आकर्षित केले. जागतिक अहवालानुसार नजीकच्या भविष्यात अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंगमध्ये तेजीची शक्यता आहे.

एरिना अ‍ॅनिमेशनच्या एफसी रोड कॅम्पसचे संचालक निखिल हल्ली यांनी म्हटले आहे की, कोविड – 19 मध्ये लाइव्ह ॲक्शन प्रोग्रामिंग थांबले असून त्याउलट अ‍ॅनिमेशन उद्योगाला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.

अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग हे डिजिटल मार्केटमधील प्रमुख घटक म्हणून उदयास येत आहेत. 2017 मध्ये जागतिक अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग मार्केटची उलाढाल 3.76 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स एवढी होती. तीच आता 2025 पर्यंत 4.78 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

अ‍ॅनिमेशन उद्योग हे एक भरभराटीचे क्षेत्र आहे आणि पुढील दोन-तीन वर्षांत ते इतरांपेक्षा सर्वाधिक वेगाने विकसित होणारे क्षेत्र असेल.

अ‍ॅनिमेशन किंवा व्हीएफएक्सची मागणी केवळ चित्रपटसृष्टीत- बॉलिवूड किंवा हॉलिवूडपुरतीच मर्यादित नाही तर डिजिटल स्पेस, डिजिटल मार्केटिंग, ऑटोमोबाईल क्षेत्र, ई-लर्निंग आणि इतरही अनेक क्षेत्रांमध्ये आहे, असे लंडन विद्यापीठातून अ‍ॅनिमेशन मध्ये मास्टर्सची पदवी पटकावणारे निखिल हल्ली म्हणाले.

त्यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनादेखील हा विषय शिकवला आहे.

सध्याची तरुणाई अनेक अपारंपरिक अभ्यासक्रम निवडावे किंवा नाही याविषयी साशंक आहे. त्याऐवजी ते शाश्वत आणि तितकेच समाधान देणारे अभ्यासक्रम निवडत आहेत.

जर आपण अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि गेमिंग क्षेत्रात प्रवेश करु इच्छित असाल तर, पुण्यातील एक प्रीमियर इन्स्टिट्यूट आपले स्वप्न नक्कीच साकार करु शकेल.

एफसी रोडवरील अरेना अ‍ॅनिमेशन मागील ब-याच वर्षांपासून अग्रगण्य अ‍ॅनिमेशन संस्थांपैकी एक आहे. अ‍ॅनिमेशन, व्हीएफएक्स, ग्राफिक डिझाईन, गेमिंग, डिजिटल मार्केटींग आणि वेब डिझाईन अभ्यासक्रमात करिअर कोर्स उपलब्ध करुन देणारी त्यांची एक शाखा ॲपटेक आहे.

या संस्थेच्या संचालकांनी स्वत: संस्थेत सुमारे एक हजार ते पाच हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. अरीना अ‍ॅनिमेशनच्या हजारो विद्यार्थ्यांना विशेषत: बॉलिवूड आणि हॉलिवूडसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात नाव मिळवून देण्यात मदत केली आहे.

या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी ब्लॅक पँथर, अ‍ॅव्हेंजर्स, मॅलेफिसेंट, द कॉल ऑफ द वाइल्ड आणि इतर बर्‍याच चित्रपटांमध्ये व्हीएफएक्स प्रकल्पांवर काम केले आहे.

या प्रशिक्षण संस्थेने अ‍ॅनिमेशन उद्योगामध्ये बरीच प्रगती केली आहे आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये क्रिएटिव्ह माइंड पॅन इंडिया यामध्ये आठ पुरस्कार आणि अ‍ॅनिमेशन इंडस्ट्रीत पुणेकर पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

संस्था व्हिज्युअल इफेक्ट, अ‍ॅनिमेशन, वेब आणि ग्राफिक डिझाईन, ऑगमेंटेड रिएलिटी (एआर), व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) मधील उत्कृष्ट कोर्सची असंख्य श्रेणी आयोजित करते.

अरेना अ‍ॅनिमेशन्सने ऑनलाईन सत्रे सुरु केली आहेत ज्यात व्हॅन आर्ट आणि लंडनच्या परदेशी तज्ञांच्या पथकाने अ‍ॅनिमेशन उद्योग विशेषत: कोविड -19 नंतरच्या युगाच्या भवितव्यावर लक्ष केंद्रित करणारे अनेक ऑनलाइन सत्रे आयोजित केली आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.