Pune News: ड्रेनेज लाइन्स, चेंबरची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई होणार

एमपीसी न्यूज: शहरातील ड्रेनेज लाइन्स आणि चेम्बरची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग रिसायकलिंग ही चार मशिन सात वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

रासने म्हणाले. सध्या ड्रेनेज लाइन आणि चेम्बरची साफसफाई पारंपरिक पद्धतीने म्हणजेच सक्शन किंवा जेटिंग मशिनद्वारे केली जाते. यासाठी पाणी, वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाया जातो. साफसफाई व्यवस्थित न झाल्याने वारंवार चोकप होण्याचे प्रमाण वाढते. नवीन मशिनमुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईल, ड्रेनेज लाइन्स आणि चेंबरची साफसफाई  व्यवस्थित होऊ शकेल. या यंत्रणेने काढलेला गाळ व पाणी सक्शन करून वाहनावर बसवलेल्या टाकीत फील्टर केले जाते.

त्यामुळे प्रत्येक वेळेला  फ्रेश पाण्याची गरज भासत नाही. त्यामुळे पाण्याची बचत होते. ही मशिनरी पुण्याजवळ इंदापूर येथे मेक इन इंडिया अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, बंगलोर, चेन्नई, दिल्ली, पंजाब याठिकाणी वापरण्यात येत आहे. या शहरांच्या तुलनेत पुणे महापालिकेला प्रत्येक शिफ्टला येणारा खर्च ३८ हजार ७०० रुपये इतका सर्वात कमी आहे. ReplyForward

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.