Pune News : पुणे पोलिसांतर्फे विधीसंघर्षग्रस्त बालक आणि पीडित बालकांसाठी बालस्नेही कक्षाची स्थापना

एमपीसीन्यूज : पुणे पोलीस आयुक्त व होप फॉर द चिड्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्याच्या परिसरात बालस्नेही कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. कानपूर आय.आय.टी.चे संचालक, प्रा.अभय करंदीकर यांच्या हस्ते हे करण्यात आले. बालस्नेही कक्षाची संकल्पना ही बाल हक्क संरक्षण कायदा 2015 तसेच नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट यांनी केलेल्या मार्गदर्शक तत्वाअन्वये कार्यरत करण्यात आली आहे .

विधीसंघर्षग्रस्त बालक, पीडित बालक, त्याचप्रमाणे काळजी व संरक्षणाची गरज असणारे बालक यांच्याकरीता बालस्नेही कक्ष कार्यन्वीत राहणार आहे. सदर कक्ष स्थापनाबाबत पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण व होप फॉर द चिड्रेन फाऊंडेशनच्या संचालिका कॅरोलीन वॉल्टर यांनी माहिती दिली .

_MPC_DIR_MPU_II

या कक्षाव्दारे मुलांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होवून त्यांना मनमोकळे करण्यास मदत होईल, असे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले. तसेच हा उपक्रम यशस्वी झाल्यास पुणे शहरामध्ये इतर ठिकाणीपण बालस्नेही कक्ष स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अभय करंदीकर म्हणाले, सर्व पोलीस ठाणेचे वातावरण नागरीकांना अनुकुल असले पाहिजे. या बालस्नेही कक्षाची संकल्पना ही नाविण्यपुर्ण आहे. विधीसंषर्घग्रस्त बालकांकरीता हे अत्यंत मोलाचे पाऊल आहे. त्यामध्ये सर्व संबंधीत प्रशासकीय विभागांचा सहभाग आवश्यक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.