Pune News : जयस्तंभ अभिवादन; नगरहून येणारी वाहतूक दौंड -केडगाव बायपास पासून वळविणार

पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारा महामार्ग पुर्णत: बंद

एमपीसी न्यूज : अहमदनगरकडून 31 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात पुण्याकडे जाणारी वाहतूक दौंडमार्गे वळविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

कोरेगाव भीमा येथे जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. त्यानुसार नगर-पुणे महामार्गावर बेलवंडी फाट्याच्या पुढे वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

ही वाहतूक बेलवंडी फाटा, उक्कडगाव मार्गे नगर-दौंड रस्त्याने पाटस मार्गे पुणे-सोलापूर महामार्गाला वळविण्यात येणार आहे.

त्याचवेळी पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारा महामार्ग पुर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने कळविले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.