Pune News: अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म, हाताच्या टॅटूवरून पोलिसांनी शोधला बाळाचा बाप

एमपीसी न्यूज: शाळेत जाताना एका 15 वर्षीय मुलीची एका मुलासोबत ओळख झाली. ओळखीतून ते दोघे भेटत राहिले. त्यातच या मुलाने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून ही मुलगी गर्भवती राहिली आणि तिने पुण्यातील ससून रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मुलांची कोणतीही ओळख मागे नसताना केवळ त्याच्या हातावर असलेल्या टॅटूवरून त्याचा शोध घेतला आणि त्याला बेड्या ठोकल्या.

त्या प्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी तिच्या आईसह ससून रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी आली होती. मुलगी बारामतीची असल्याने पुणे शहर पोलिसांनी याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर बारामती पोलिसांनी ससून रुग्णालयात पोहोचत पीडित मुलीचा आणि तिच्या आईचा जबाब नोंदवला.

दरम्यान आरोपीची कोणतीही माहिती पीडित मुलीला नव्हती. ती शाळेत जात असताना आरोपी ची आणि तिची ओळख झाली होती. आणि याच ओळखीतून पुढे त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. मुलगी गरोदर राहिल्यानंतर आरोपी मात्र पसार झाला. दरम्यान समाजात बदनामी होईल या भीतीने मुलीच्या कुटुंबीयांनीही याविषयी अधिक वाचता न करता गर्भपात करण्यासाठी ससून रुग्णालयात पीडित मुलीला आणले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. दरम्यान आरोपी मुलाच्या हातावर बदाम व सागर असे गोंदले असल्याचे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गोपनीयरित्या तपास करत आरोपीला अटक केली.

पोलिसांनी या प्रकरणी सलीम उर्फ सागर इक्बाल मुश्रीफ (वय 25) याला अटक केली. तो क्लीनर असल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध कलम 376 व पास्को कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.