Pune News : दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुण्याला पावसाने झोडपले

एमपीसी न्यूज : नवरात्रौत्सवाची आज सांगता होत आहे. आज, शनिवारी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुण्याला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपूून काढले.

अचानक आलेल्या पावसामुळे पुण्यातील मध्यपेठांसह लक्ष्मीरस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता येथील बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरीकांची चांगलीच तारांबळ उडाली.

शिवाजीनगर, स्वारगेट, सिंहगड रस्ता, वारजे माळवाडी, कर्वेनगर, कोथरूड, जंगली महाराज रस्ता, फर्ग्यूसन कॉलेज रस्ता, गणेशखिंड रस्ता, पुणे विद्यापीठ चौक, राजभवन रस्ता, औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी, हिंजवडीसह पिंपरी चिंचवडमध्येही प्रचंड पाऊस पडला.

_MPC_DIR_MPU_II

दसऱ्याच्या मुहूर्तावर रस्त्याच्या कडेला झेंडूची हार, फुले आणि आपट्यांची पाने विकणाऱ्या व्यापाऱ्यांना भर पावसात धावपळ करावी लागली.

भर पावसात दुचाकीवर घरी परतणाऱ्या नागरीकांनी मिळेल तिथे आसरा घेतला. बाजारपेठांमध्ये आज गर्दी दिसत होती. परंतु संध्याकाळी पावसामुळे गर्दी ओसरू लागली.

चतु:श्रृंगी देवस्थानाबाहेर ऑनलाईन दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी पावसात दर्शन घेतले. पावसामुळे काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला होता. रस्त्यांवरील सिग्नल बंद असल्यामुळे वाहतूक संथ गतीने होत होती.

दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना पावसामुळे निर्माण झालेल्या गारव्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like