Pune News : दिवाळीनंतर शंभर टक्के क्षमतेने पीएमपीएमएलच्या बससेवा सुरू होण्याची शक्यता

 एमपीसी न्यूज : कोरोना महामारीमुळे लॉकडाऊननंतर पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या 50 टक्के क्षमतेनुसार तब्बल 550 बसेस मुख्य मार्गांवर धावत आहेत. परंतु, दिवाळीनंतर शंभर टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पीएमपीएमएलचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र जगताप यांनी सांगितले.

पीएमपीएमएलच्या ताफ्यात एकूण 2600 बसेस आहेत. त्यापैकी शंभर टक्के क्षमतेनुसार शहर आणि उपनगरांच्या मार्गांवर बस धावल्या, तर 1600 बसेस रस्त्यावर आणल्या जातात. कोरोनानंतर लॉकडाऊन अनलॉक झाल्यानंतर सुरवातीला अत्यावश्यक सेवांसाठी त्यानंतर सर्वांसाठी अशा टप्प्याटप्प्यामध्ये 550 बस सुरू केल्या आहेत.

सध्या शहरातील जीवनमान पूर्वपदावर येत आहे. दिवाळी सणापुर्वी कोरोना विषाणुचा संसर्ग दर घटत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर शंभर टक्के क्षमतेने बससेवा सुरू करण्याचे विचाराधीन आहे. पीएमपीएमएल प्रशासनाकडून याबाबतची चाचपणी सुरू आहे.

कोरोना बाधितांची संख्या घटत असली तरी दुसरी लाट येण्याच्या शक्यतेवर या बाबतचा पुढील अंतिम निर्णय घेतला जाईल, असे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.