Pune News : भिडे – एकबोटे यांच्यावर दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रस्ताव मंजूर : गृहमंत्री अनिल देशमुख

एमपीसी न्यूज : कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडे, मिलींद एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई होईल. त्यांच्यावर दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला आहे, अशी माहिती राज्याचे अनिल देशमुख यांनी पुण्यात दिली.

पुणे दौऱ्यावर येरवडा कारागृहाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना गृहमंत्री देशमुख म्हणाले, कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी तपास पूर्ण झाला आहे. या प्रकरणी संभाजी भिडे, मिलींद एकबोटे यांच्यावर रीतसर कारवाई होईल. त्यांच्यावर दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर केला गेला असल्याचे त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

नवीन वर्षाची सुरुवात झाली म्हणून येरवडा कारागृहाला भेट दिली आहे. येरवडा कारागृह बाबत काही मागण्या होत्या. त्या बाबत निवेदन घेतले आहे. कारागृहात कैद्यांची क्षमतेपेक्षा जास्त संख्या असून आपल्याला मॉडर्न कारागृह करायचे आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे कारागृहाची क्षमता वाढविण्यासाठी प्रस्ताव दिला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम केले तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं दुकान बंद होऊ नये म्हणून ते महाविकास आघाडीवर टीका करत असतात, असा टोमणाही गृहमंत्र्यांनी यावेळी लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.