kusavli News: कुसवली गावातील रस्त्याच्या कामाचे सारिका सुनिल शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी  न्यूज: आंदर मावळातील अतिशय दूर्गम आदिवासी गाव अशी ओळख असलेल्या कुसवली येथील रस्त्याच्या कामाचे भूमिपुजन आज करण्यात आले. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या आमदारनिधीतून १७ लाख रूपये खर्चाचा निधी या कामासाठी नुकताच मंजूर झाला होता.आता प्रत्यक्ष कामाला भूमिपूजन करून सुरूवात करण्यात आली. आमदार शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते विधीवत पुजा करून या कामाला सुरूवात करण्यात आली.टाकवे ते खांडी या मुख्य रस्त्यावरील कुसवली फाटा ते कुसवली गावापर्यंत दिड किलोमीटर लांबीचा हा डांबरी रस्ता आता होणार आहे.

गावातील नागरिकांचे या जोडरस्त्याच्या खराब स्थितीमुळे पावसाळ्यात प्रचंड हाल होत होते.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शोभाताई सुदाम कदम, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष नारायणराव ठाकर, तळेगाव नगरपरिषदेच्या नगरसेविका संगीताताई शेळके, कुसवलीच्या सरपंच चंद्रभागा दाते,कुसवलीतील सहारा वृध्दाश्रमाच् संचालक विजय जगताप,डाहूली सरपंच नामदेवराव शेलार, ऊंब्रे गावचे माजी सरपंच दत्तात्रेय पडवळ, टाकवे गावच्या सुप्रिया मालपोटे ,खांडी गावचे सरपंच आनंता पावशे,कशाळ गावचे सरपंच मारुतराव खामकर ,उपसरपंच संगीताताई खांडभोर , राष्ट्रवादी काँग्रेसच्या  मावळ तालुका आदिवासी सेल अध्यक्ष विक्रम हेमाडे ,डोंगरी परिषद सदस्य शुभांगी दरेकर , कुसवलीच्या माजी सरपंच फसाबाई चिमटे, सदस्य सिद्धार्थ भालेराव, सदस्य अनिकेत कदम ग्रामसेवक रत्नपारखी , मुकुंद खांडभोर अविनाश शिंदे ,बाळासाहेब दाते, राष्टवादी  काँग्रेस  सरचिटणीस आदिती तनपुरे, रंजना आंबेकर, अनिता ठाकर, संगिता शिंदे, पोलीस पाटील सुलोचना मंगेश चिमटे ,काळूराम चिमटे ,नाथा चिमटे,व ग्रामस्थ मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.