Pune News : सर्व क्षेत्रात महिलांचा 50 टक्के सहभाग आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हे

एमपीसी न्यूज – ‘महिला सक्षमीकरण हे ध्येय आहे आणि सुरक्षितता हा त्यावरून जाण्याचा मार्ग असून, सर्व क्षेत्रात महिलांचा 50 टक्के सहभाग असणे आवश्यक आहे.’ असे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिला हिंसाचार विरोधी दिनानिमित्त 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2021 या कालावधीत ‘महिला सक्षमीकरण व महिलांची सुरक्षितता’ या विषयावर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणुन शनिवारी (दि.04) ‘महिलांची सुरक्षितता व महिला सक्षमीकरण’ यांच्या अंतर्गत महिलांचे समुपदेशन या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, याप्रसंगी डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.

महिला अत्याचाराच्या घटनाच्या बाबतीत बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, सर्व घटनांमध्ये तीन महत्वाचे मुद्दे लक्षात घेऊन त्यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. त्यापैकी पहिला मुद्दा म्हणजे आपण स्त्रीचे म्हणणे ऐकायला शिकले पाहिजे.दुसरा मुद्दा म्हणजे स्त्रिया जेंव्हा अन्यायाबाबत सांगत असतात तेंव्हा या अन्यायाबाबत कोणत्या कायदयातून आधार मिळू शकतो ,याबाबत कोणकोणत्या उपाय योजना आहेत, याबाबत त्यांना माहिती देणे गरजेचे आहे.तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपण काय करू शकतो याबाबत विचार करणे .स्त्रियांवरील अत्याचार रोखण्यासाठी बेल बजावो मोहीम,भरोसा सेल यांनी काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे ,याबाबत त्यांनी माहिती दिली.

2030 पर्यंत सर्व क्षेत्रात 50 टक्के महिला असाव्यात यादृष्टीने सर्व महिलांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे डॉ गोऱ्हे यांनी सांगितले. चर्चा सत्राचा समारोप 10 डिसेंबर, 2021 रोजी होईल. यामध्ये महाराष्ट्र शासनाचा नवीन शक्ती कायदा याबाबत चर्चा करण्यात येईल असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.