Pune News : मराठा आरक्षणासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक; प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर संबळ बजाव आंदोलन

एमपीसीन्यूज : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी केंद्रामध्ये बाजू मांडावी, या मागण्यांसाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडकडून ‘संबळ बजाव’ आंदोलन करण्यात आले. ‘ एक मराठा लाख मराठा, विद्यार्थ्यांचे प्रवेश व नोकरीतील निवड सुरक्षित करा’, अशा घोषणा देत आंदोलकांनो संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

मराठा समाजावर अन्याय झालेला आहे. केंद्र व राज्य सरकार तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी मतभेद बाजूला ठेवून कोणतेही राजकारण न करता विनाविलंब मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे. न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करून मराठा आरक्षणा संदर्भात न्यायालयात केंद्र सरकारने सुद्धा भक्कम बाजू मांडली पाहिजे.

केंद्र सरकारने जर चाल ढकल करण्याचा प्रयत्न केल्यास मराठा समाज शांत बसणार नाही. त्यासाठी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देत, केंद्रातील मंत्री असल्याने या विषयात आपण लक्ष घालावे, अशा आशयाचे निवदेन यावेळी मंत्री प्रकाश जावडेकर यांना देण्यात आले.

याबरोबरच मराठा समाजाला केंद्र व राज्य दोन्हीकडे शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे अशीही मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, छावा संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर-पाटील, किरण मोरे, प्रशांत कुंजीर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.