Pune News : ज्येष्ठ शिक्षण आणि व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे निधन

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ शिक्षण आणि व्यवस्थापनशास्त्र तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे वृद्धपकाळाने पुण्यात राहत्या घरी निधन झाले. ते 92  वर्षाचे होते. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

प्रभाकर चिंतामण शेजवलकर ऊर्फ डॉ. प्र. चिं. शेजवलकर हे मराठी लेखक, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यवस्थापनतज्ज्ञ होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि 2012 मध्ये अध्यक्षपद त्यांनी भूषविले. डॉ. शेजवलकर वाणिज्य, व्यवस्थापन, अर्थ, बॅंक, विमा, शिक्षण, साहित्य, अध्यात्म अशा विविध क्षेत्रांत सहजपणे मुसाफिरी करत.

त्यांनी विद्यापीठाच्या स्तरावर सुमारे 60 वर्षे अध्यापन केले. पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे ते प्रमुख होते. काही व्यवस्थापन संस्थांचे प्रमुख संचालकपदही त्यांनी भूषविले.

पुणे विद्यापीठाच्या ‘नॉलेज मॅनेजमेंट’ या अभ्यासमंडळाचे ते अध्यक्ष होते. पुणे स्टॉक एक्स्चेंजचे देखील ते संचालकही होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.