Pune news: रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 109 जणांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – संत निरंकारी मिशनअंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात 109 जणांनी रक्तदान केले.

संत निरंकारी भवन, गंगाधाम, मार्केटयार्ड पुणे येथे रविवारी (दि.25) आयोजित या शिबिराचे उद्घाटन निरंकारी मंडळाचे पुणे झोन प्रभारी ताराचंद करमचंदानी यांच्या हस्ते संपन्न झाले. पूनम पाटील, स्वाती चिटणीस यांनी सदिच्छा भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या कार्याचे कौतुक केले.

संत निरंकारी मिशनमध्ये रक्तदानाची सुरवात 1986 पासून झाली. आजपर्यंत मिशनच्या माध्यमातून 11 लाखाहून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर एप्रिल 2020 पासून आतापर्यंत पुणे जिल्ह्यामध्ये 17 रक्तदान शिबीर संपन्न झाली आहेत.

यामध्ये 1516 युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे संत निरंकारी मिशनचे अनुयायी रुग्णालयामध्ये स्वतः प्लास्मा दान करण्याचे महान कार्य करीत आहेत.

रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ससून रुग्णालय रक्तपेढी, कमांड रुग्णालय रक्तपेढी, वाय.सी. एम, रुग्णालय रक्तपेढी यांच्या विनंतीनुसार मिशन तर्फे पुण्याच्या विविध भागांमध्ये रक्तदान शिबीर संपन्न होत आहेत.

रक्तदान शिबिरात प्रशासन व डॉक्टरांनी दिलेल्या सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यात येत असून सोशल डिस्टंसिंगकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. या शिबिरात परिसरातील नागरिकानी रक्तदान करून या मानवतेच्या कार्यामध्ये सहभागी झाल्याबद्दल संत निरंकारी मिशनचे झोनल प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी सर्वांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.