Pune News : मेट्राेच्या खाेदकामात सापडलेल्या ‘त्या’ अवशेषाचा पुरातत्व विभागाकडून होणार अभ्यास

एमपीसीन्यूज : पुण्यातील मध्यवर्ती भागातील मंडई परिसरात भूमिगत मेट्राेचे काम सुरु असून कामगारांना खाेदकाम करत असताना एका अज्ञात प्राण्याचे अवशेष सापडले आहेत. सदर प्राण्याचा हाडांचा आकार माेठा असून ते अवशेष हत्ती सदृश्य प्राण्याचे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुरातत्व विभाग सदर अवशेष ताब्यात घेऊन त्याची शास्त्रीय पध्दतीने तपासणी करुन अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.

मंडईत बुधवारी खाेदकाम करताना मेट्राेच्या कर्मचाऱ्यांना 10 फुट खाेलीवर हाडे मिळून आली हाेती. त्यानंतर हळुवारपणे संबंधित हाडे जमीनीतून बाहेर काढण्यात आली. त्यांचा आकार माेठा असल्याचे व ती हत्ती सदृश्य प्राण्याची असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

प्रथमदर्शनी हे अवशेष जीवाश्म स्वरुपातील असावेत. हाडांची झालेली झीज व मिळून आलेल्या खाेलीवरुन ती 150 ते 200 वर्षापूर्वीची असावीत अशी शक्यता आहे. नेमके काेणत्या प्राण्याचे ते अवशेष आहे व तत्कालीन परिस्थितीची माहिती सखाेल संशाेधना नंतरच मिळेल अशी माहिती डेक्कन काॅलेज ऑफ आर्किओलाॅजीचे संशाेधक डाॅ.सचिन जाेशी यांनी दिली आहे.

या अवशेषांचा अधिक अभ्यास करण्यासाठी राज्याचे पुरातत्व विभागाकडून ती ताब्यात घेतली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.