Pune News : शिवजयंतीनिमित्त पुण्यातील ‘हे’ रस्ते वाहतूकीसाठी बंद

0

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त पुण्यातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोड, बाजीराव रोडवरुन मिरवणूका निघत असतात तसेच नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्‍यता असते. त्यामुळे, शुक्रवारी (दि.19) शिवजयंती निमित्त पुण्यातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोड, बाजीराव रोड वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला येणार आहे. नागरिकांनी यादिवशी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी याबाबत आदेश काढला आहे. या आदेशानुसार, शिवजयंती निमित्त लक्ष्मीरोड, शिवाजीरोड, बाजीराव रोडवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवजयंती दिवशी पहाटे 5.00 वा. पासून गर्दीसंपेपर्यंत हे तिन्ही मार्ग सर्व प्रकारच्या बसेस व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद राहितील. यावेळेत नागरिकांना आपल्या इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करता येईल.

या पर्यायी मार्गाचा अवलंब करता येईल 

– शिवाजीरोडवरुन स्वारगेटला जाणाऱ्या वाहन चालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक टिळक चौक- टिळक रोडने इच्छितस्थळी जाता येईल.

_MPC_DIR_MPU_II

– स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाणाऱ्या वाहन चालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छितस्थळी जाता येईल.

– अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व फुटका बुरुजकडे येणारी वाहतूक बंद करुन ही वाहतूक केळकररोडने सरळ पुढे इच्छित स्थळी जाईल.

– लक्ष्मीरोडवरुन जाणारी वाहतूक संत कबीर चौकातून बंद करुन सर्व वाहने नेहरु रोडने सेव्हन लव चौकाकडे तसेच उजवीकडे वळून पावर हाऊस चौकाकडून पुढे इच्छितस्थळी जातील.

– बाजीराव रोडवरुन मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकत्तेनुसार पुरम चौकातून टिळकरोडने पुढे खंडोजीबाबा चौकातून इच्छितस्थळी जाईल.

– गणेश रोडवरुन फडके हौदकडे येणारी वाहने ही देवजीबाबा चौकातून डावीकडे वळून पुढे हमजेखान चौकाकडे वळवून पुढे स्वारगेट अथवा इच्छितस्थळी जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.