Pune : मावळच्या खासदारासह पाच नेते होते या खंडणीखोराचे पुढचे टार्गेट

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजकीय नेत्यांकडे खंडणी मागणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. एकतर्फी प्रेमात नकार दिल्याने या तरुणाने तरुणीला त्रास देण्यासाठीच शहरातील राजकीय नेते आणि बांधकाम व्यावसायिकांकडे खंडणी मागितली होती. दरम्यान या खंडणीखोरांच्या रडारवर आणखी पाच राजकीय नेते असल्याचे आता उघडकीस आले आहे.  शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक श्रीनाथ भीमाले आणि मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनाही खंडणीसाठी धमकी देण्याचे त्याचे पुढील टार्गेट होते. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने त्याला अटक करून हा सर्व प्रकार समोर आणला आहे.

शाहनवाज गाझीयखान (वय 31, रा. मका मस्जिदजवळ, गुरुवार पेठ, सध्या रा. कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यापूर्वी अशाच गुन्ह्यात इम्रान समीर शेख (वय 37, रा. घोरपडीगाव) याला अटक करण्यात आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील महिन्यात पुणे शहरातील राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमकी देणारे फोन करण्यात आले होते. माजी नगरसेवक दीपक मिसाळ, वसंत मोरे यांचा मुलगा रुपेश मोरे, अविनाश बागवे महेश लांडगे या राजकीय पदाधिकाऱ्यांना खंडणीसाठी फोन करण्यात आले होते.(Pune) पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असता आरोपी शहानवाज याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.

Pune : अखेर पुणे महानगरपालिकेला आली जाग; 21 अनधिकृत होर्डींग्स समवेत 239 बोर्डांवर कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शहानवाज आणि इमरान यांची मॅरेज ब्युरो एजन्सी आहे. आरोपी इमरान याने शहानवाज्याला एक लग्नाचे स्थळ सुचवले होते. मात्र संबंधित तरुणीने शहानवाज सोबत लग्न करण्यास नकार दिला होता. त्यानंतर इम्रानने तिला मागणी घातली होती. त्यालाही तिच्या घरच्यांनी नकार दिल्यावर इम्रानने तरुणीचा फोटोचा वापर करून तिच्या नावाने फेसबुक अकाउंट तयार केले.

तिचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो प्रसारित केले. त्याबाबत चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन त्याला गेल्या वर्षी अटक झाली होती.

शाहनवाज हा वेगवेगळ्या व्हॉट्सॲप मॅरेज ब्युरो ग्रुपमध्ये सहभागी असून, त्याने स्वत:च्या डीपीला महिलेचा फोटो लावून ग्रुपमधील लोकांशी महिला असल्याचे भासवून चॅटिंग करत असे.(Pune) व्हॉट्सॲपचा ओटीपी मागून त्यांचे व्हॉट्सॲप तो हॅक करत होता. या हॅक केलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरून तो राजकीय व्यक्ती, व्यावसायिकांना खंडणी मागत होता. अशा पद्धतीने त्याने माजी नगरसेवक दीपक मिसाळ, मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश, व्यावसायिक अनुज गोयल, माजी नगरसेवक अविनाश बागवे, आमदार महेश लांडगे यांना खंडणी मागितली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.