Pune : स्वयंसेवी संस्था या दबाव गट झाल्या पाहिजे – डॉ. कल्याणी मांडके

एमपीसी न्यूज – आपण समाजाच काहीतरी देणं लागतो. सामाजिक बांधिलकीची (Pune)आपल्याला जाणीव असली पाहिजे. हक्क माहित आहेत पण कर्तव्य माहित नाही, ही खूप दरी आहे. वैचारिकदृष्टया सर्व सामाजिक ,स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या पाहिजेत. 1 लाख 87 हजार स्वयंसेवी संस्थाची नोंदणी आहे. स्वयंसेवी संस्था या दबाव गट झाले पाहिजे. असे मत डॉ. कल्याणी मांडके मांडले.

नॉन रेसिडेंट इंडियन्स पॅरेण्टस् ऑर्गनायझेशन(नृपो) संस्थेच्या (Pune)वतीने सदस्यांचा स्नेह मेळावा शनिवारी उत्साहात पार पडला. ‘नृपोजगत्’ दिवाळी अंकाचे प्रकाशन आणि मृदुला मोघे यांचा ‘एका पेक्षा एक-एकपात्री बहुरूपी’ मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य हाॅटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट चे ‘यश रिजन्सी ‘सभागृह,शिवाजीनगर येथे संपन्न झाला. डॉ. कल्याणी मांडके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.


नवीन सभासदांचे स्वागत व परिचय करून देण्यात आला.दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.नृपो चे अध्यक्ष बी.बी. कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कामकाजाची माहिती दिली. दोनशेहून अधिक सभासद या कार्यक्रमाला उपस्थित होते.’नृपोजगत ‘ दिवाळी अंकाचे प्रकाशन डॉ. कल्याणी मांडके आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.नृपो चे अध्यक्ष बी.बी. कुलकर्णी यांच्या हस्ते डॉ. कल्याणी मांडके आणि मृदुला मोघे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना डॉ. कल्याणी मांडके म्हणाल्या, ‘ नृपो ‘ संस्थेने आयोजित स्नेहमेळाव्यात आपल्या सर्वांशी बोलण्याची संधी मला मिळाली. सामाजिक बांधिलकीतून मी आपल्याला सांगते की,आपण समाजाच काहीतरी देणं लागतो.

Talawade : तळवडे दुर्घटनेतील आणखी दोन जखमींचा मृत्यू; अवघ्या 16 वर्षीय तरुणीचे संपले जीवन

सामाजिक बांधिलकीची आपल्याला जाणीव असली पाहिजे. हक्क माहित आहेत पण कर्तव्य माहित नाही, ही खूप दरी आहे. वैचारिकदृष्टया सर्व सामाजिक ,स्वयंसेवी संस्था एकत्र आल्या पाहिजेत. 1 लाख 87 हजार स्वयंसेवी संस्थाची नोंदणी आहे. स्वयंसेवी संस्था या दबाव गट झाले पाहिजे. ‘ नृपो ‘ चे सदस्य या कार्यात आपले योगदान देऊ शकतात. तुमचा वेळ, तुमचं ज्ञान त्यांना द्या.तुम्हाला एखादे आनंदाचे झाड मिळेल’.

डॉ. सुरेश मांडके, सुरेश नाईक, नृपो दिवाळी अंकाच्या संपादक प्रा. वैदेही कुलकर्णी, अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.विद्याधर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र माहूलकर यांनी आभार मानले.यानंतर मृदुला मोघे यांचा ‘एका पेक्षा एक-एकपात्री बहुरूपी’ मनोरंजनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.